चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 302 कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 24 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 302 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 197 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील 27 वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील 68 वर्षीय महिला, चिमूर येथील 56 वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 217 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 205, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 197 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 14 हजार 584 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 302 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 439 झाली आहे. सध्या 2 हजार 928 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 14 हजार 632 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 98 हजार 556 नमुने निगेटीव्ह आले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 197 बाधितांमध्ये 108 पुरुष व 89 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 67, पोंभुर्णा तालुक्यातील 11, बल्लारपूर तालुक्यातील सहा,  मुल तालुक्यातील 35, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील 11,  नागभीड तालुक्‍यातील 16, वरोरा तालुक्यातील 13,भद्रावती तालुक्यातील 11, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील तीन, राजुरा तालुक्यातील तीन, गडचिरोली सात तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 197 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील  भानापेठ वार्ड, रयतवारी कॉलरी, मार्डा, सुभाष नगर, दुर्गापुर, स्नेहनगर, जुनोना चौक परिसर, भिवापुर वॉर्ड, लखमापूर, जलनगर, बालाजी वार्ड, वडगाव, राष्ट्रवादी नगर, हनुमान नगर, तीर्थरूप नगर, तुकूम, सरकार नगर, गौतम नगर, माता नगर, इंदिरानगर, बापट नगर, बालाजी वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील बामणी, दूधोली, कोठारी भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील  आनंदवन परिसर, बावणे लेआउट परिसर, हनुमान वार्ड, सोईट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, शेष नगर, देलनवाडी, बोरगाव, कुरझा, नवेगाव, मेढकी, हलदा परिसरातून बाधित ठरले आहे.
भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगर, आंबेडकर वार्ड, नवीन सुमठाना, गुरु नगर, भंगाराम वार्ड, डिफेन्स चांदा परिसर,सागरा,माजरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चौगान, शिवाजी वार्ड, रामनगर भागातून बाधित पुढे आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी, नवेगाव, लोनखैरी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, कन्हाळगाव, गोवर्धन चौक परिसर, नवखळा, वलणी, बाळापुर, पुलगाव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसर, अंबुजा सिमेंट कॉलनी परिसर,उपरवाही भागातून बाधित ठरले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील वार्ड नंबर 13, वार्ड नंबर 12, वार्ड नंबर 7 परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.मुल तालुक्यातील वार्ड नंबर 7, वार्ड नंबर 16, वार्ड नंबर 12, वार्ड नंबर 9, मारोडा, मारेगाव,गडीसुर्ला, चिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील जोगापुर, विहिरगाव, बँक ऑफ इंडिया परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here