
चंद्रपूर: ३१ ऑगस्ट
चंद्रपूर जिल्हा कारागृहातील ७१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आल्यानंतर आज यामध्ये आणखी ५५ बाधितांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी कारागृहामार्फत ८० कैद्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये ७१ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर ३० ऑगस्ट ला रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये जिल्हा कारागृहात आणखी ५५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. खबरदारी म्हणून कोरोनाबाधित सर्व कैद्यांना जेलमध्येच अलगिकरण केले जात आहे.
तीन दिवसांपूर्वी कारागृह प्रशासनाकडून बंदिवान आणि कर्मचारी यांची कोविड टेस्ट घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट रविवारी रात्री आल्यानंतर जेल प्रशासनाला धक्काच बसला आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण १२७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा मध्यवरती कारागृह अधीक्षक आगे यांना याबाबत विचारले असता त्यांनी एकूण १२७ पैकी एक बाधित दवाखान्यात भर्ती असल्याची माहिती दिली आहे.