
चंद्रपूर:31 ऑगस्ट
राज्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून दिवसांगणीक विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून आता चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. जोरगेवार यांच्या कार्यालयातून या संदर्भात माहिती मिळाली आहे.
आमदार जोरगेवार यांची कोविड-19 ची रिपोर्ट काल रात्री 12 वाजता पॉझिटिव्ह आल्याने आज 31 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता ते वन अकादमी येथील कोविड सेंटर मध्ये उपचारा साठी भर्ती होणार आहेत. माझी तब्येत ठीक आहे. काळजी करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.