देशातील महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप

चंद्रपूर : केंद्रातील  मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, केंद्र सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मोदी सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या वतीने जीवघेण्या महागाईविरोधात ८ ते १६ जुलै या कालावधीत आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (ता. १०) सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी बोलत होते.
पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या सायकल यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर गांधी चौक, जटपुरा  गेट, प्रियदर्शिनी चौकमार्गे मार्गक्रमण करीत कस्तुरबा चौक येथे रॅलीचा समारोप झाला. प्रियदर्शिनी चौकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच रॅलीदरम्यान पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावर गुलाबपुष्पाचा  वर्षाव करीत  महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केल्याबद्दल आभार मानण्यात आले.
रितेश (रामू) तिवारी पुढे म्हणाले, पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे, तर डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर भरमसाठ कर लावल्याने नागरिकांना पेट्रोल १०६ रुपये आणि डिझेल ९६ रुपये प्रती लिटर दराने खरेदी करावे लागत आहे. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही. तर दुसरीकडे महागाई वाढली आहे. या दृष्टचक्रात सर्वसामान्यांसोबतच  मध्यम वर्गही  भरडला जात आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, सेवादल जिल्हाध्यक्ष नंदुजी खनके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेशभाऊ चोखारे, महानगरपालिका विरोधी पक्षनेते डॉ. सुरेशजी महाकुलकर, नगरसेविका सुनीता लोढ़िया,  माजी महापौर संगीताताई अमृतकर, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे,  नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक संतोष लहामगे,  माजी नगरसेवक  गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजू रेवल्लीवार, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक बापू  अंसारी, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, युथ काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्याल, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश पदाधिकारी संजय रत्नपारखी, युसूफ भाई, महिला शहर उपाध्यक्ष सुनंदा धोबे, चंदाताई वैरागडे, ताजुद्दीन शेख,  एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, सलीम शेख, मोहन डोंगरे, राहिल कादर, राजू खजांची, चंद्रमा यादव, नौशाद शेख, विजय धोबे, प्रवीण डाहुले, मनीष तिवारी, पवन आगदारी, ताजु भाई, कसीफ अली, राजू वासेकार, इरफ़ान शेख, निसार भाई, अजय बल्की, कृणाल रामटेके, योगानंद चंदनवार, प्रीतिसा शाह, कोंद्राजी, रामकृष्णा, मनोज खांडेकर, पप्पूभैय्या सिद्दीकी, मुन्ना बुरडकर, इरफान शेख, सलीम भाई, कासिफ अली, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, कृणाल रामटेके, राजू त्रिवेदी, राजू वासेकर, गोलू तिवारी, बंडू तोटावार, वायफडे गुरुजी, अशोक गड्डमवार, प्रकाश देशभ्रतार, रुषभ दुपारे, राजेश रेवल्लीवार, शुभम कोराम, अंकुर तिवारी, सूर्य अडबाले, हाजी अली, शुभम कोराम, साबिर सिद्दीकी, मिनल शर्मा, अनीश राजा, चिंटू पुगलिया, बंटी शैलेशचंद्र, धर्मेंद्र तिवारी, स्नेहल अंबागडे, शिल्पा आंबटकर, पूजा वैरागडे, श्रुती मोरे, इम्रान अत्तरवाला, अवि बेले,  अविनाश लांजेवार, कैलास सातपुते, सतिश वासाडे, बंटी तुंगावार, सन्नी लहामगे, राजेश वर्मा, विकास खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here