राजकारणाचा वापर समाजसेवेसाठी करा: खासदार बाळू धानोरकर  

भानापेठ येथील युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश 

चंद्रपूर : समाजातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचे काम करावे.  प्रत्येकाने राजकारणात येऊन राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
शहरातील भानापेठ येथे शनिवारी (ता. ७) अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल,  अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख,  युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, विनोद संकत, अशोक मत्ते यांची उपस्थिती होती.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले, देशात क्रांती करण्याची ताकद युवकांमध्ये आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करीत युवकांनी आपली शक्ती दाखवून दिली आहे. आपल्या विजयात युवकांचे मोठे योगदान आहे.
रितेश (रामू) तिवारी यांनी काँग्रेस पक्ष सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे, समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारा पक्ष आहे. त्यामुळे अनेकजण राजकारणात येताना काँग्रेस पक्षाची निवड करतात. प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येयधोरणे घराघरापर्यंत पोहोचवून पक्षाला पुन्हा बळकट करावे, असे आवाहन केले.
यावेळी  राहुल चौधरी, नीतेश पाटील, आसीप खान, गुड्ड शेडमाके, पाशा शेख, ताहीर मामू , कुणाल, आदेश, सचिन, रिशब, विक्की, मोहन, राहुल, ओम, चिराग, निखिल, अरबाज, निर्मला चौधरी, सूमन सिडाम, अंजु ठोंबरे, माला ठोबरे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांचे पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.  यावेळी एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे,  एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, माजी नगरसेविका वंदना भागवत, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, धर्मेंद्र तिवारी, राज यादव, सलीम शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here