चंद्रपुरात काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ

स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर यांचा सत्कार

चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात मंगळवारी (ता. ९) आझादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. या यात्रेदरम्यान स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रांतिदिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना स्मरण करण्यासाठी आझादी गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी पालकमंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत शहरातील विविध प्रभागातून निघणार आहे.
आज सकाळी ८ वाजता पठाणपुरा गेट येथून पदयात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर विठ्ठल मंदिर, बिनबा गेट, एकोरी मंदिर, मिलन चौक मार्गे मार्गक्रमण करीत यात्रेचा पठाणपुरा गेट येथे समारोप झाला. या यात्रेदरम्यान स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर यांचा सत्कार करण्यात आला. या यात्रेत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, महिला काँग्रेसच्या (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, महिला काँग्रेसच्या शहर माजी जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, एनएसयुआयचे कुणाल चहारे, माजी नगरसेवक प्रशांत दानव, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेविका विना खनके, ओबीसी विभागाचे उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष बोबडे गुरुजी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, गोपाल अमृतकर, श्रीकांत चहारे, नौशाद शेख, मनीष तिवारी, प्रीती शाह, अजय बल्की, बापू अन्सारी, राजू खजांची, सागर खोब्रागडे, राजेश वर्मा, राहुल चौधरी, केतन दुर्सेलवार, शुभम कोर्हाम, चंदनवार सर, अल्पना तिवारी, किशोर जोगी, भूपेश रेगुंडवार, एजाजभाई, मीनाक्षी भुजारकर, राजू बनकर, राजू चौधरी, अनिल शिंदे, राजेंद्र गर्गेलवार, पीयूष चहारे, अमोल देबातवार, विजय पाऊणकर यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभागासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उद्या १० ऑगस्टला सकाळी ८ वाजता कस्तुरबा चौक येथून यात्रा निघणार आहे. जोडदेऊळ, हनुमान खिडकी, भिवापूर, महाकाली, अंचलेश्वर, दादमहलमार्गे मार्गक्रमण करीत यात्रेचा कस्तुरबा चौक येथे समारोप होणार आहे. पदयात्रेत सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here