मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना

कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना आर्थिक मदत व उद्योग व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज योजना आखण्यात आली आहे.

मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदतीचा हात देत स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी, 28 लाख, 81 हजार 200 रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले असून त्यापैकी 71 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा. राज्य शासनाने प्राधान्याने मराठा प्रवर्गातील व ज्यांच्याकरीता कोणतेही महामंडळ अस्तित्वात नाही, अशा फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे. उमेदवारांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणारी राज्य शासनाची ही एकमेव योजना आहे. लाभार्थ्याची कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यावर व्याज आकारण्याची जबाबदारी ही राज्य शासन घेत आहे. बँकांनाही या योजनांबाबत विश्वास निर्माण झालेला आहे. या योजनेचा लाभ कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम तसेच लघु,मध्यम उद्योगासाठी करावा. उत्पादन, व्यापार, विक्री सेवा या क्षेत्रासाठी देखील या योजनेतून कर्ज उपलब्ध केल्या जाते. पुरुषासाठी 18 ते 50 वर्ष वयोगट तर महिलांसाठी 18 ते 55 वर्ष वयोगट निश्चित करण्यात आला आहे. यातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन विभागाअंतर्गत कर्ज देण्याची सोय करण्यात आली आहे.

तरी, जिल्ह्यातील मराठा व ब्राह्मण समाजातील नागरिकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळातंर्गत उद्योग व्यवसायासाठी असलेल्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हास्तरीय समन्वयक अमरीन पठाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here