जिल्हा सामान्य रुग्णालयात स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

१ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपूर : येथील१ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी १ ऑगस्टला जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या या सप्ताहाचे घोषवाक्य स्तनपानाकरिता प्रगतीचे पाऊल, शिकवू या आणि आधार देवू या… असे आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीप्ती श्रीरामे होत्या. तर, प्रमुख पाहुणे म्हणून सीओजीएसच्या उपाध्यक्ष डॉ. मनीषा घाटे, आयएमए वुमन विंगच्या डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. आसावरी देवतळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिसेविका पळसकर यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्तनपानामुळे माता, बालकाला होणारे फायदे, स्तनपानाची पद्धत, चीकदुध, बाळाचा आहार याविषयी मार्गदर्शन केले. स्तनपानाविषयी महिलांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही मत उपस्थितांनी व्यक्त केले. या सप्ताहात प्रसुतीकक्ष, प्रसुतीपश्चात कक्ष, सिझरियन वॉर्ड, बालरोग कक्ष, एनआरसी कक्ष, एएनसी क्लिनिक, लसीकरण ओपीडी येथे जनजागृती, प्रदर्शनी, आरोग्य शिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संचालन पब्लिक हेल्थ नर्स आशा बावणे यांनी, तर आभार आहारतज्ज्ञ सुजाता जोंधळे यांनी मानले. कार्यक्रमाला परिचारिका, पीएचएन, नर्सिंग ट्युटर, नर्सिंग प्रशिक्षणार्थी, लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here