खासदार बाळू धानोरकर यांनी केली चंद्रपूरच्या पूर परिस्थितीची पाहणी

चंद्रपूर : मागील आठवड्यापासून सर्वत्र पाऊसाची संततधार असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या लगत असलेले इरई नदीचे सातही दरवाजे प्रशासनाने १ मीटर उघडे केले आहे. त्यामुळे शहरातील पठाणपुरा, रहमत नगर तसेच इतर रहीवाशी क्षेत्रात पाणी आले आहे. या परिस्थितीची पाहणी करत जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनासोबत खासदार बाळू धानोरकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना शाळेत हलविण्यात आले. यात नुकसान झालेल्या रहीवास्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार निलेश गौंड, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, काँग्रेस जिल्हा शहर अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल रजा, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, माजी नगरसेवक बापू अन्सारी, माजी नगरसेविका सकिना अन्सारी, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, अमीर शेख, पप्पू सिद्धीकी, सौरभ ठोंबरे यांची उपस्थिती होती.

शहरात २०१३ नंतर हि परिस्थिती उद्भवली आहे. मागील दहा वर्षानंतर शहरात पाणी आले आहे. परंतु यात कोणतीही जीवित हानी होऊ नये याकरिता प्रशासनातर्फे उपायोजना करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. पठाणपुरा व रहमतनगर येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली. यासोबतच ५६ नागरिकांना आंबेकर लेआऊट येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळेत त्यांना ठेवण्यात आले. तिथे देखील खासदार धानोरकर यांनी भेट दिली. यात वैद्यकीय व्यवस्था व त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेच्या आढावा त्यांनी घेतला. त्यासोबतच कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास स्वतः मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here