
चंद्रपूर: शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 राेजी रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचा पदग्रहण समारंभ रोटरी जिल्हा 3030 चे माजी प्रांतपाल श्री. शब्बीर शाकीर यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरच्या हॉटेल ट्रायस्टार येथे पार पडला. रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचे मावळते अध्यक्ष रोटे. राजेंद्र कंचर्लावार यांनी आपला पदभार 2022-23 चे नवनियुक्त अध्यक्ष रोटे . सीए पियुष मामीडवार आणि त्यांच्या टीमकडे सोपविला . यावेळी नव्या 17 सदस्यांना रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचे सदस्यत्व प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल रोटे. शब्बीर शाकीर यांचे शुभहस्ते बहाल करण्यात आले .
मावळते अध्यक्ष रोटे.राजेंद्र कंचर्लावार यांनी मागील वर्षांत रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टने केलेल्या प्रकल्पांची माहिती सांगितली. तर नवे अध्यक्ष रोटे. पियुष मामीडवार यांनी येणाऱ्या वर्षांत रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टतर्फे घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांबद्दल उपस्थितांना अवगत केले.
प्रमुख अतिथी रोटरी जिल्हा 3030 चे माजी प्रांतपाल रोटे . श्री. शब्बीर शाकीर यांनी आपल्या खुमासदार शैलीत उपस्थित रोटेरी सदस्यांना मार्गदर्शन केले.नवे वर्ष 2022 -23 साठी अध्यक्ष रोटेरियन पियुष मामीडवार यांनी आपल्या संपूर्ण टीमची घोषणा केली. यात रोटे. परितोष गुंडावार यांची सचिव पदी तर कोषाध्यक्ष म्हणून रोटे. दीपक चौधरी यांची नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नव्या टीममध्ये नियुक्त करण्यात आलेल्या इतर सदस्यांचे देखील माजी प्रांतपाल रोटे. शब्बीर शाकीर यांचे हस्ते स्वागत करण्यात आले .
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव रोटे. परितोष गुंडावार यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रोटे. प्रवीण पोशट्टीवार तथा इनरव्हीलच्या सदस्या श्रीमती प्रिया पोशट्टीवार यांनी केले . या समारंभास रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचे सदस्य , त्यांचे कुटुंबीय व इतर रोटरी क्लब मधील सदस्य उपस्थित होते. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .