
चंद्रपूर: वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा झटका बसला असून, घरगुती १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर या सिलिंडरसाठी राजधानी दिल्लीमध्ये १,०५३ रुपये, मुंबई १,०५२, कोलकाता १,०७९, चेन्नई १,०६८ रुपये तर चंद्रपुरात १,१०० रुपये मोजावे लागणार आहेत.