

अॅड.जयंत साळवे यांचा संग्रह
चंद्रपूर : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड.जयंत साळवे यांच्या ‘मित्रा’ या पत्रसंग्रहाचे रविवारी (ता. ३ जुलै ) सायंकाळी ५ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. येथील रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणार सरोवरचे डॉ. विशाल इंगोले राहतील. श्रीमती शालिनी आणि सौ. अपूर्वा साळवे यांच्या हस्ते पुस्तकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. भाष्यकार म्हणून नागपूरचे प्रभू राजगडकर, डॉ. पद्मरेखा धनकर, तर प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जानगरचे भूपेश नेतनराव यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन किशोर मुगल करणार असून, आभार किरण काशिनाथ करतील.
माजी आमदार अॅड.एकनाथ साळवे यांचे चिरंजीव अॅड.जयंत साळवे यांचे नाव वकिली क्षेत्रात नावाजलेले आहे. वकिली व्यवसायासोबतच अॅड.साळवे यांना लिखाण, वाचनाची मोठी आवड आहे. त्यांनी आजपर्यंत लेखण केलेल्या पत्रांचे एकत्रित संग्रह करण्यात आला आहे. या पुस्तकाचे सप्तरंग प्रकाशन राजुराच्या वतीने प्रकाशन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सप्तरंग प्रकाशनचे मनोज बोबडे यांनी केले आहे.