
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढायला लागलाय. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालीय. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. मला कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधं घेत आहे. सध्या मी विलगीकरणात आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांनीसुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावी, सगळ्यांनी काळजी घ्यावी, असंही देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय.