हिन्‍दी अंतिम राज्‍य नाटय स्‍पर्धेत बकुळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री; रौप्‍य पदकाची मानकरी

चंद्रपूर:सांस्‍कृतीक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित साठाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य हिन्‍दी नाटय स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत सुर्यांश साहित्‍य व सांस्‍कृतीक मंच चंद्रपूर या संस्‍थेने सादर केलेल्‍या ‘रूपक’ या नाटकातील रूपा या मध्‍यवर्ती भूमीकेसाठी बकुळ धवने हिला सर्वोत्‍कृष्ट अभिनेत्री म्‍हणून रौप्‍य पदक जाहीर झाले आहे.

रजनीश जोशी लिखीत व नूतन धवने दिग्‍दर्शीत तसेच इरफान शेख निर्मीत या नाटकाची प्रकाशयोजना हेमंत गुहे यांनी केली असून नेपथ्‍य तेजराज चिकटवार व पंकज नवघरे यांचे आहे. लिलेश बरदाळकर यांचे संगीत असून मेघना शिंगरू व बबीता उईके यांनी रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. या नाटकात विशाल ढोक, रोहिणी उईके व बकुळ धवने यांच्‍या प्रमुख भुमीका आहेत. बकुळ धवने हिच्‍या या उल्‍लेखनीय यशाबद्दल येथील सांस्‍कृतीक वर्तुळात तिचे अभिनंदन व कौतुक करण्‍यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here