IPL सट्टयावर पोलिसांची धाड;चंद्रपुरात 27 लाखांचा मुद्देमाल जब्त

चंद्रपूर:सध्या भारत देशात IPL क्रिकेटचा खेळ सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा हे दिनांक २०/०५/२०२१ रोजी त्यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह शासकीय वाहनाने पेट्रोलींग करीत असता अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी त्यांना कळविले कि, मौजा घुन्धुरा येथील राहणारा पृथ्वीराज घोरपडे हा स्वताचे राहते घरी एका खोलीत ५ ते ६ ईसम IPL क्रिकेट च्या खेळावर लोकांकडून मोबाईल फोनवरून पैश्याची पैज चा खेळ खेळीत असल्याची मुखबिरद्वारे गोपनीय खात्रीशीर खबर मिळालेली आहे तरी त्याचेवर छापा मारून कायदेशीर कार्यवाही करणे बाबत निर्देशित केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे कार्यालयातील पोलिस कर्मचा-यांची टीम व उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा कार्यालयातील पो. कर्मचा-यांची टिम तयार करून अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात ते घुग्घुस येथे जाऊन तिथे राहणारा पृथ्वीराज घोरपडे याचे घरी जाऊन IPL क्रिकेट च्या खेळावर लोकांकडून मोबाइल फोनवरून पैश्याची पैज लाऊन हार जितचा जुगाराचा खेळ खेळीत असल्याबाबत पंचा समक्ष छापा टाकून झडती घेतली असता एका खोलीत सहा इसम बसून होल्ड पेटी मध्ये एकूण २४ नग मोबाईल फोनची जोडणी करून इतर १२ एंड्राइड फोन गादीवर सभोवती ठेऊन IPL क्रिकेट मॅचवर लोकांकडून मोबाईल फोन कॉलींग वरून पैश्याची पैज लाऊन हार जीतचा जुगाराचा खेळ खेळवित असल्याचे दिसून आले. त्याकरिता त्यांनी टाटा स्काय रिसीव्हर, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन हॅन्डसेट एकून ३६ नग, दोन सॅमसंग कंपनीचे टॅब, दोन नग वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप , पर्सनल एसी, विद्युत बोर्ड, एक जुना वापरलेला डाटा केबल, एक जुना चार्जर एक टाटा स्कॉय रिमोट, १ LCD टिव्ही व रिमोट, २ को-या कागदावर बोगस आकडे लिहीलेले बॉल पेन, इत्यादी साहित्य मिळून आले. नमुद इसमाची अंगझडतीत रोख रक्कम १,९५०-/ रुपये तसेच आरोपींनी घटनास्थळी खेळण्याकरिता वापरलेली फॉरच्यूनर क्रमांक एम. एच. 29 बीसी ५७८६ आणि डस्टर गाडी क्रमांक एम. एच. ४८ पी. ४१६३ या वाहनासह एकूण २७,४४,५९० /- रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याने पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल व आरोपीयांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशन घुग्गुस येथे आणून नमुद आरोपीता विरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ ३४ भादवि सह कलम ४. [५] मजुका, कलम २५ (4) भारतीय तार अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here