चंद्रपूर मनपाचे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांना बदलीनिमित्त निरोप

चंद्रपूर: शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांच्या बदलीनिमित्त आज दिनांक 2 मे रोजी निरोप समारंभ घेण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाला मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर शहर अभियंता महेश बारई, नवनियुक्त मुख्य लेखाधिकारी बागडे आणि सत्कारमुर्ती मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती.

मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार हे चंद्रपूर शहर महानगरपालिकेत मागील काही वर्षांपासून कार्यरत असून, त्यांची नांदेड येथे बदली झाली आहे. या निमित्त त्यांचा आयुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनपाच्या विविध विभागप्रमुखांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here