आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश:

चंद्रपूर मनपा क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 5 कोटी रुपये मंजूर

चंद्रपूर:चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत येणा-या क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीला यश आले असून महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यात बाबुपेठ येथील स्मशानभूमीच्या विकासकामाचाही समावेश आहे.

चंद्रपूर मतदार संघातील विकासकामांसाठी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. कोरोनाच्या काळात अपेक्षित असा निधी उपलब्ध झाला नसला तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाची गती कमी झालेली नाही. विविध विभागाअंतर्गत चंद्रपूर मतदार संघासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून अनेक विकासकामे केल्या जात आहे. तर यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहे. दरम्याण चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत येणा-या क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करता यावा या करिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावाही सुरु होता. त्यांच्या याच पाठपूराव्याला आज यश आले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास निधी अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतील 2 कोटी रुपये बाबूपेठ येथील स्मशानभूमिच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.

सदर स्मशानभूमीचा विकास व्हावा अशी येथील नागरिकांची फार जूनी मागणी होती. त्यामुळे ही मागणी पूर्ण व्हावी या करिता आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनस्तरावर प्रयत्न सुरु केले होते. आज मंजूर झालेल्या निधीत सदर कामाचाही समावेश असल्याने बाबूपेठ येथील नागरिकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. तर 20 लक्ष रुपयातून जटपूरा गेट येथील व्यायम शाळेच्या जागेवर शेडचे बांधकाम, एक कोटी रुपयातून चंद्रपूर शहरात येणा-या मुख्य तिनही रस्त्यांवर भव्य प्रवेशद्वार, 80 लक्ष रुपयातून चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जागेवर समाज भवनाचे बांधकाम, तर जगन्नाथ बाबा मठ येथे सामाजिक भवन आणि प्रवेश द्वारच्या बांधकामा करिता एक कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. सदर सर्व कामांमुळे चंद्रपूरच्या विकासात मोठी भर पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here