जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर चंद्रपूरची सायली बनली सहायक अभियंता!

चंद्रपूर : सायली दिगंबर ठोंबरे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी २०१९ च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आपण पुढे जाऊ शकतो, हे तिने यातून दाखवून दिले आहे.
सायलीने चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नोव्हेंबर २०१९ ला एसपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी पदासाठी जाहिरात निघताच तिने अर्ज केला. सातत्यपूर्ण व कठोर परिश्रमातून तीने परीक्षा उत्तीर्ण केली. जानेवारी २०२२ ला तिची मुलाखत झाली. स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल १३ एप्रिलला घोषित झाला. त्यात तिने घवघवीत यश संपादन केले आहे. सायली ने आपल्या यशाचं श्रेय आई,बाबा,शिक्षकांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here