

चंद्रपूर : महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मुंबई येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल रेफरी हेमंत शामराव घिवे यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल रेफेरीज बोर्डच्या राज्य कन्व्हेनरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. घिवे हे मागील अनेक वर्षांपासून व्हॉलीबॉल खेळाशी जुळलेले असून, राज्य पातळीवर त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. आता त्यांची निवड राज्य समन्वयक म्हणून झाल्याने क्रीडा क्षेत्रात कौतुक केले जात आहे. या निवडीचे स्वागत प्रकाश सुर्वे, किरण मोडकवार, गजानन जीवतोडे, सुनील तिवारी, मारोती पुनवटकर यांनी केले आहे.