नक्षलग्रस्त भागातील नवयुवक-युवतीं करीता चंद्रपूर पोलीस दलातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर: जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना नक्षलवाद्याच्या भुलथापांना बळी न पडता प्राप्त होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ घेवून आपले चांगले जीवन जगावे व शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, यासाठी बुधवार दि.०९/०३/२०२२ रोजी चंद्रपुर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने पोलीस स्टेशन जिवती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशिलकुमार नायक यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्ह्यामधील नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे हेतुने पोलीस स्टेशन जिवती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात नक्षलग्रस्त भागातील १३५ युवक-युवतींनी सहभाग घेतला. मेळाव्यामध्ये योग्य युवक युवतीचे अधिकाऱ्यांकडुन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशन जिवतीचे ठाणेदार सपोनि. सचिन जगताप, पोउपनि शहाजी घोडके, वैभव इंटरप्राईजेस नागपुर या कंपनीकडुन नॅशनल अप्रेंटीस प्रमोशन स्कीम अंतर्गत कंपनीचे संचालक श्री मयुर उजवणे व त्यांचे सहकारी अनिल बाजुजवार, सन्नी जैन, श्रेयश कोकोडे, गणेश गडकर यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here