
मुंबई : भारताची गान कोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.