चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे येथील गांधी चौकात प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्तात्रय, के. के. सिंग, डाॅ. सुरेश महाकुलकर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढिया, राजेश अडूर, सचिन कत्याल, माजी महापौर संगीता अमृतकर, शिवा राव, नंदू खनके, प्रवीण पडवेकर यांच्यासह सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here