अंशतः निर्बंध लावून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन सफारी सुरु ठेवा

खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीमुळे रुग्णसंख्या पुन्हा झपाट्य़ाने वाढतेय. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कोरोनासंबंधीत निर्बंध कडक केले जात आहे. या निर्बंधांची नवी सुधारित नियमावली राज्य सरकारने 9 जानेवारी 2022 रोजी जाहीर केली, याअंतर्गत आता राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहे. त्या निर्बंधांनुसार चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारपासून म्हणजे 11 जानेवारीपासून हे निर्बंध अंमलात आणले जाणार आहे. परंतु यात अंशतः निर्बंध लावून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन सफारी सुरु ठेवा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

कोरोना महामारीमध्ये सतत डिड – दोन वर्षे लोकडाऊन मुले आर्थिक परिस्तिथीने लाखो कुटुंबे होरपळुन आहेत. थोडी फार रोजगाराची सुरुवात झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. क्षेत्रसंचालक ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) महाराष्ट्र शासन यांनी देखील याबाबत विनंती पत्र पाठवले आहे. मध्यप्रदेशातील पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना, संजय डुबरी व राजस्थानातील रणथंबैर,बेला लेपर्ड पार्क, झलना कर्नाटकातील कबीनी, बांदीपूर, नागरहोल व उत्तर भारतातील व्याघ्र प्रकल्प करबेट इत्यार्दी प्रकल्प सुरु असताना केवळ ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प ज्यात जिप्सी चालक, रिसॉर्ट कामगार व शेकडो अधिकारी – कर्मचारी इतर व्यवसायिक आर्थिक तणावात आले आहेत.

सद्यस्थितीत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झालेच आहे. त्यासोबत कोरोना प्रतीबंधक उपाययोजना अवलंब करीत पर्यटन आधारित रिसोर्ट, हॉलमध्ये काम करणारे, जिप्सीचालक, मालक, गाईड, सर्वसाधारण कामगार, मजूर इत्यार्दीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा संकट टाळण्यासाठी ४ पर्यटक प्रति जिप्सी वाहन यानुसार मर्यादेत सफारी करण्यात यावी अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here