३ जानेवारीपासून चंद्रपूरात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना ‘कोव्हॅक्सिन लस’   

चंद्रपूर, ३० : चंद्रपूर शहरात मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड१९ लसीकरणाला सुरुवात झाली. ९५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आता ३ जानेवारीपासून चंद्रपूरात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी आज ३० डिसेंबर रोजी दिली.

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे वाढते कोरोना रुग्णांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण वाढविण्यासाठी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येईल. १५ ते १८ वर्षे वयोगटातील नवीन लाभार्थी हा २००७ वा त्यापूर्वी जन्मलेला असावा. लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा दि. १ जानेवारी २०२२ पासून सुरु होईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी मनपा प्रशासनाद्वारे स्वतंत्र लसीकरण केंद्र निश्चित करण्यात येणार असल्याचे डॉ. वनिता गर्गेलवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here