साहसी सायकलिंगमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची आणखी एक नोंद

तीन सायकलस्वारांची ३०० किलोमिटरला गवसणी

नागपूर : हवामान आणि भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता शरीरासोबतच मनाची कसोटी पणाला लावणारा लांब पल्ल्ल्याचा साहसी सायकलिंग प्रकार अर्थात ब्रेव्हे झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याने आणखी एक विक्रम रविवारी आपल्या नावावर नोंदविला. जिल्ह्यातील तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमिटरच्या अंतराला गवसणी घालत हे दिव्य पेलले.

जिल्ह्यातील सुनील जुनघरे, अब्दुल आबिद कुरेशी आणि पियुष कोटकर या तिघांनी ३०० किलोमिटचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमिटरच्या ब्रेव्हे साठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. सायकलस्वारांना चंद्रपूरपर्यंत पोचून परत नागपूरला पोचण्यासाठी २० तासांचा अवधी देण्यात आला होता. त्यासाठी ३७ साहसी सायकलस्वारांनी नोंदणी केली होती. एक सायकलस्वार वगळला तर यात सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व ३६ सायलस्वारांनी या ३०० किलोमिटर अंतराला गवसणी घातली.
या ब्रेव्हेसाठी विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, वरूडसह मध्यप्रदेशातील जबलपूर आणि कर्नाटकातील बंगळूरू येथूनही साहसी सायकलस्वार सहभागी झाले होते. हे ३०० किलोमिटरच्या अंतराचे साहस पूर्ण करणाऱ्यांमध्ये नागपूरातील स्वाती आणि अजय कुलकर्णी, अॅनी विल्किन्सन,

अमरावती जिल्ह्यातील अमिता आणि श्रीराम देशपांडे, राधा राजा, अंजली देशमुख , अतूल कळमकर आदित्य उपासे. पियुष खंडेलवाल, आदित्य लोखंडे, पराग भोंडे, बंगळुरूचे चेतन घोरपडे. जबलपूरचे मौसम पालेवार, मौदाचे लीलाधर ठवकर, प्रशांत चंदनखेडे, यवतमाळचे लियाकत हुसेन, नरेंद्र पहाडे यांचा समावेश होता. या खेरीज आशिष चौधरी, प्रदीप यादव, आनंद कलचूरी, अनिकेच झा, मल्लिनाथ कोळी, सौरभ साठे, मयंक गुप्ता, अनुराग कुमार, रवींद्र पांढरे, तन्मय पारखी, धर्मपाल फुलझेले, रमणप्रकाश नाकतोडे, देवेश तिवारी, धीरज महाडिक आणि भूषण वासवानी यांनीही या ३०० किलोमिटरच्या अंतराला गवसणी घातली.
योगेश दापूरकर, अनिरुद्ध कुलकर्णी आणि मंगेश पहाडे यांनी सायकलस्वारांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. सायकलस्वारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून विकास पात्रा आणि अमोल रामटेके यांनी व्यवस्थापन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here