उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांची जुगार अड्डयावर धाड

चंद्रपूर : चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी जुगार अड्डयावर छापा टाकुन १८ जणांना ताब्यात घेतले आहे. १८ आरोपींकडुन ३ लाख ३४ हजार ५२६ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी १८ जणांविरुध्द दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुर्गापुर हद्दीतील आंबेडकर चौकातील खानदे यांचे दुकानाचे मागील भागातील उत्तरवार यांचे दुकानाचे चाळीमधील दुकानात सट्टापट्टीवर पैसे लाऊन जुगार खेळत आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत श्री. सुधीर
नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांना प्राप्त झाली, त्यावरून सदर ठिकाणी नंदनवार यांनी स्टाफसह छापा मारला.

यावेळी सट्टीपट्टी चालविणाऱ्यासह एकुण १८ इसम जुगार खेळतांना मिळुन आले. सदर इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. १८ इसमांच्या अंगझडतीत रोख रक्कम व इतर साहीत्य असा एकूण ३,३४,५२६ /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथील पोलीस स्टॉप स. फौ.राजेश चुचूलवार, पो. हेड कॉ. किसन राठोड, पोलीस अमलदार शितल बोरकर, मनोज चालखुरे, पुर्वेश महात्मे, आदेश रामटेके, जगदीश जिवतोडे व अमरदिप आवळे यांचेसह करण्यात आलेली असुन एकुण १८ आरोपीविरुध्द कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे दुर्गापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here