
मुंबई,16 डिसेंबर: महाराष्ट्र सरकारनं दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तारखांची घोषणा केली आहे.
बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होईल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
परीक्षेविषयी माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, “ओमिक्रॉन संदर्भात आपण सातत्यानं मॉनिटरिंग करत आहोत. हे करत असताना दहावी आणि बारावी हे विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं वर्षं असतं. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होईल. तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
याव्यतिरिक्त बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहे, तर दहावीच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहे.”
“या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मागील काळात जसे पेपर घेत होतो, तशाच पद्धतीनं परीक्षी घेतली जाणार आहे,” असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.