स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चंद्रपूर डाक विभागातर्फे स्वच्छता पखवाडा साजरा

चंद्रपूर: स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत भारतीय डाक विभागातर्फे 16 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत चंद्रपूर विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये स्वच्छता पखवाडा साजरा करण्यात आला. सर्व पोस्ट ऑफिस तसेच प्रशासकीय कार्यालयात स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी टपाल कार्यालयातर्फे स्वच्छता रॅलीही काढण्यात आली.

स्वच्छता पंधरवाडा दरम्यान टपाल विभागाने सर्व पोस्ट ऑफिस चे परिसर आणि परिसराच्या बाहेर स्वच्छता करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. टपाल वसाहती तसेच पोस्ट ऑफिस परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यालय परिसरात पोस्टर्स/बॅनर्स लावून स्वच्छता, सामाजिक अंतर, कोविड-19 रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता पसरवणे हाही या पंधरवाड्याचा उद्देश होता. कर्मचारी व जनतेला फेस मास्क, सॅनिटायझर, साबण आदींचेही वाटप करण्यात आले. स्वच्छता पखवाडा दरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये विविध स्पर्धा आणि वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here