वीजबिल भरुन सहकार्य करण्याची महावितरणची ग्राहकांना साद

चंद्रपूर,२३ नाव्हेंबर: वीजबिल भरण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध असतांनाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून गेल्या १२ महिण्यांत, वीजबिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यामुळे आता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आता नाईलाजाने वसुली करीता ग्राहकांच्या दारापर्यंत जात आहेत. वीजग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे बील वेळेवर स्वतःहून भरणे अपेक्षित असतांना, महावितरणचे अभियंता्, अधिकारी व कर्मचारी महावितरणच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरले आहेत. इतर सर्व सेवांसाठी नगदी पैसे मोजणारे ग्राहक ज्या वीजेशिवाय थोडाही वेळ राहू शकत नाही त्या अत्यावश्यक सेवेचे पैसे मात्र भरण्याचे टाळून महावितरणला अडचणित लोटत आहेत तसेच स्वत:च वीजपुरवठा ख्ंडीत करण्यास महावितरणला प्रवृत्त करीत आहेत.

सध्यास्थितीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये , इतर लघुदाब, पाणीपुरवठा योजना, कृषिपंपधारक व पथदिवे या ग्राहकांकडे ऑक्टोबर २०२१ पर्यंत थकबाकी एकूण थकबाकी ४१८ कोटी झाली आहे. ४२१ कोटीवरून महिनाभरात फक्त ३ कोटीने ही थकबाकी खाली आली आहे. सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करने हे आदय कर्तव्य मानून वेळोवेळी कोळसा टंचाईच्या काळात देखील इतर स्त्रोतांतून वीज खेरेदी करीत महावितरण ग्राहकांना अंधारात जाण्यापासून वाचवित आहे. परंतु अनेक ग्राहक वीजेसारख्या अतिआवश्यक सेवेचे पैसे वीजबिलाच्या माध्यमातून भरण्याचे टाळून महावितरणसाठी व स्वत:साठी अडचणी निर्माण करीत आहेत. महावितणवर ७३ हजार कोटीचे ऋण झाले असूनही ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे कर्तव्य महावितरण पार पाडीत आहे. वीजनिर्मिती व पारेषण कंपन्या यांना रोखीने पैसे अदा करुन ग्राहक सेवेचे व्रत पार पाडीत आहे. तसचे वीजेचे वहन व्यवस्थित सुरळीत व योग्य दाबाचे होण्यासाठी वीजयंत्रणा उभारणे तसेच दुरुस्ती कामांवर रोखीने खर्च करीत असतांना ग्राहकांचीही साथ मिळावी ही अपेक्षा बाळगुन आहे.

विशेष म्हणजे करेाना काळात ज्या ग्राहकांना करोनाची झळ विशेष पोहेाचली नाही अशांनी देखिल वीजबिल भरले नसल्याचे समोर आले व त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांत प्रामुख्याने पेट्रोलपंपधारक, दवाखाने, पोल्ट्री फार्मस, धाबे यांचा समावेश आहे. १० सीएनजी व पेट्रोलपंधारक, ३५ खाजगी दवाखाने, १३७ पोल्ट्री फार्मस, १६ होर्डींगज १६१ तात्पुरत्या वीजजोडण्यांचा व १२० धाबे यांचा समावेश आहे. या सर्वांकडे ४२ लाख १९ हजार थकले आहेत.

चंद्रपूर मंडळात घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ३० लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे २केाटी ३७ लाख, औद्योगिक २ कोटी १२ लाख, कृषिग्राहकांकडे ९४ कोटी
३९ लाख, पथदिवे ७० कोटी ९४ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना ५७ लाख तसेच इतर लघुदाब ग्राहकांकडे ७८ लाख अशी एकंदरीत १७६ कोटी ४८ लाख थकबाकी आहे.

तर, गडचिरेाली मंडळात घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे ४४ लाख, औद्योगिक ३३ लाख, कृषिग्राहकांकडे ८८ कोटी ७२ लाख, पथदिवे १४७ कोटी ९६ लाख, ग्रामिण व शहरी पाणीपुरवठा योजना २८ लाख तसेच दतर लघुदाब ग्राहकांकडे ८४ लाख अशी एकंदरीत २४२ कोटी ४७ लाख थकबाकी आहे.

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुली, वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई तसेच संशयास्पद वीजवापर ज्यात १ ते ३० युनिट वीजवापर व शुन्य वीजवापर असणारे ग्राहक तसेच वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल न येणारे ग्राहकांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत असून तपासण्यात आलेल्या ६५ हजार८३० ग्राहंकापैकी २५९ वीजचोरी करतांना आढळले. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

कृषिपंपधारकांसाठी नवीन कृषिउर्जाधोरणामधून थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणद्वारा करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक उपविभागात शाखा कार्यालय स्तरावर कृषिग्राहकासाठी मेळाचे घेण्यात येत आहेत व त्यांस चांगला प्रतिसाद लाभत असून कृषिपंपधारक थकबाकीमुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. या योजणेमधून मार्च २२ पर्यंत सुधारीत थकबाकीच्या ५० टककेच भरावे लागणार आहेत, तर मार्च २३ पर्यंत ७० टक्के म्हणजे ३० टककयानी सूट कमी होईल तर मार्च २४ पर्यंत ८० टकके भ्रावे लागणार म्हणजे २० टक्के सुटीचा लाभमिळणार आहे त्यामुळे कृषिग्राहकांनी २०२३-२०२४ ची वाट न पाहाता मार्च २२ पर्यंत थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी साधावी असे आवाहन महावितरण करीत आहे.

थकबाकीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहक अशा एकूण १९ हजार ५०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित झाल्यावर वीजनियामक आयोगाच्या निर्देषानुसार नियमाप्रमाणे पुणर्जेाडणी शुल्क आकारण्यात येत आहे. आठवडयाचे सातही दिवस थकबाकीदारांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर आढल्यास वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व कलम १३८ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे . ग्राहकांना वीजबिल भरणे सोईचे व्हावे यासाठी प्रत्येक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आहेत. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल ऍप , गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देवून वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा वेळेवर करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here