अपर पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड

एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना चंद्रपूर-बल्लारपूर रोडलगत बाबानगर येथे रात्रीच्या सुमारास काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची  गोपनीय माहिती मिळाली.  त्याआधारे अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे बाबानगर येथील राजेश गुप्ता नावाच्या इसमाच्या घरावर धाड टाकली.
या धाडीमध्ये गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे वय 29 वर्ष, रा.पेठ वार्ड आंबेडकर चौक राजुरा, राजेश रामचंद्र गुप्ता वय 45 वर्ष रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर, प्रदीप दिनकर गमगमवार वय 41 वर्ष रा.महाकाली वार्ड, हाफिज रेहमान खलील रेहमान वय 53 वर्ष रा गुरूनगर वणी, शेख असिफ शेख चांद वय 30 वर्ष रा. पारवा ता. घाटंजी, नंदकुमार रामराव खापने वय 29 वर्ष रा. कोलगाव ता. मारेगाव, गणेश रामदास सातपाडे वय 35 वर्षे रा. गडचांदूर, समीर सचिन संखारी वय 50 वर्ष रा. विवेक नगर चंद्रपूर, आकाश चंद्रप्रकाश रागीट वय 30 वर्ष रा.लक्कडकोट ता. राजुरा, गौरव लक्ष्मण बंडीवार वय 26 वर्षे रा. नांदाफाटा ता. कोरपना, श्रीनिवास रामलु रंगेरी वय 50 वर्ष रा. लालपेठ, सुरेश पुनराज वावरे वय 53 वर्ष रा. बाबुपेठ वॉर्ड चंद्रपुर यांच्यासह एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. सदर इसमांकडून 1 लक्ष 97 हजार 250 रुपये,  11 मोबाईल फोन, 3 चारचाकी वाहने, 3 दुचाकी वाहने असा एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे अपराध क्रमांक 858/2021 च्या कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे. सदर कामगिरी अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. असे पोलीस विभागाच्या जनसंपर्क कक्षाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here