मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम

चंद्रपूर दि. 25 ऑक्टोंबर : मतदार नोंदणीसाठी 13,14 व 26,27 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.तरी ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाही अश्या नागरीकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. इ 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यत दावे व हरकती  स्विकारण्याचा कालावधी राहील . तर 13 व 14 तसेच 27 व 28  नोव्हेंबर रोजी विशेष  मोहिमा राबविण्यात येतील.20 डिसेंबरपर्यत दावे व हरकती निकालात काढता येतील.तर 5 जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसीध्दी करण्यात येईल. विशेष मोहिमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here