दसऱ्यानंतर आता चंद्रपुरच्या शिक्षकांची दिवाळी जाणार अंधारात?

चंद्रपूर:जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त 5 ते 7 हजार शिक्षकांचे माहे सप्टेंबर चे वेतन रखडले आहे, दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन हे सण तर विनावेतनाने गेलेच, येणारी दिवाळी सुद्धा अंधारात जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
मागील वर्षभरात फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचेच वेतन महिना महिना उशिराने होत आहे इतर आस्थापनेतील शिक्षक व अन्य राज्य शासकीय कर्मचारी यांचे वेतन मात्र नियमित होत आहे, यासाठी निधीचे कारण सांगितले जात आहे मात्र फक्त शिक्षकांच्याच वेतनाचा निधी कसा कमी येतो किंवा येत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी तर माहे सप्टेंबर च्या वेतनासाठी निधी उपलब्ध असतांना कार्यालयीन अनास्थेमुळे शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाला आहे, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला करावे असे शासन निर्देश वारंवार येत असतात मात्र स्थानिक प्रशासन या आदेशांना केराची टोपली दाखवत असते व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नावाने असलेल्या या शिक्षण विभागाला शिक्षकांबद्दल आस्था राहिली नाही हेच यावरून दिसून येत आहे. दिवाळी सणापूर्वी त्या महिन्याचे वेतन मिळायला पाहिजे बाकी अन्य सर्व कर्मच्याऱ्यांचे मिळतेही शिक्षकांची ही दिवाळी मात्र अंधारात जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
करिता याबाबत सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठांकडे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तक्रार करणार आहे अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी विजय भोगेकर, हरीश ससनकर अल्का ठाकरे, दीपक वर्हेकर, नारायण कांबळे, रवी सोयाम, लोमेश येलमुले, निखिल तांबोळी, दुष्यंन्त मत्ते,अनंता रासेकर, सुनीता इटनकर, विद्या खटी, माधुरी निंबाळकर, सुलक्षणा गायकवाड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here