नांदाफाटा येथे १२०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

ग्रामदूत फाउंडेशन व ग्रामसंवाद सरपंच संघटनेचा पुढाकार

चंद्रपूर / कोरपना : ग्रामदूत फाऊंडेशन व ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र, अस्थीरोग, मेंदूरोग व मेंदूविकार तसेच स्त्रीरोग तपासणी शिबीर नांदाफाटा येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच पार पडले. यात एकुण १२०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स.सदस्य श्यामसुंदर राऊत तर उद्घाटक म्हणून अल्ट्राटेकचे महाव्यवस्थापक संजय शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.अनिल मुसळे, प्राचार्या डॉ.अलेक्झांड्रीना डिसूझा, माजी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामदूतचे अध्यक्ष रत्नाकर चटप, ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे एड.देवा पाचभाई, आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे, भामरागडचे सामाजिक कार्यकर्ते चिन्ना महाका उपस्थित होते.

शिबीरात आदिलाबाद येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश राठोड, नेत्रतज्ञ डॉ.प्रतिभा चव्हाण राठोड, चंद्रपूरातील प्रसिद्ध मेंदूरोग व मेंदूविकार तज्ञ डॉ.कपिल गेडाम, प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉ.श्वेता कपील गेडाम यांनी रुग्नांची मोफत तपासणी व रोगनिदान केले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद वाघाडे, प्रास्ताविक ग्रामदूतचे सचिव अविनाश पोईनकर तर आभार प्रकाश उपरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामदूतचे प्रा.रुपेश विरुटकर, प्रशांत जोगी, चंदू झुरमुरे, मुरलीधर बोडके, संदिप खिरटकर, प्रा.प्रकाश लालसरे, प्रितम मेश्राम, गणेश पिंपळकर, मंगेश माहूरे, किसन आत्राम, रवी बंडीवार, प्रमोद खिरटकर, स्वप्निल झुरमुरे, हबीब शेख, चंद्रशेखर राऊत, संजय नित, आदित्य बोडके, नितीन खनके, आकाश बोडके, यादव नांदेकर, चेतन चौधरी, दिनेश राऊत, रवी बेरड, अजित शेख, अमोल वाघाडे, विशाल भिमेकर, प्रदिप मासूरकर, संदिप खिरटकर, सुभाष खोके, बारसागडे, प्रविण कुरसंगे, रवी तोगरे, रवी बोढाले, अरुण काळे, किशोर खनके, हरी बोरकुटे, संतोष गिलबिले यांनी अथक परिश्रम केले.

कोरोना काळात रुग्नांना दिलासा

नांदा, बिबी, आवाळपूर, नोकारी, पालगाव, पिंपळगाव, नारांडा, हिरापूर, सांगोडा आदी गावातील नागरिकांची नेत्ररोग, अस्थीरोग, मेंदूरोग, स्त्रीरोग तज्ञांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या काळात या शिबीरामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या शिबीराच्या माध्यमातून सामाजिक भान ग्रामदूत संस्थेच्या माध्यमातून जपले गेल्याची भावना अल्ट्राटेकचे महाव्यवस्थापक संजय शर्मा, प्राचार्य अनिल मुसळे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here