
चंद्रपूर:सौर ऊर्जेला प्रोत्साहन देताना सोलर रूफ टाॅप लावणाऱ्यांना अनुदान देण्यात येणार असून याकरीता नवीन व नवीकरनीय उर्जा मंत्रालयाद्वारा सोलर रूफ टाॅप योजना जाहिर केली आहे. या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांकरीता जास्तित जास्त 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. महावितरणने अधिसुचना निर्गमित करत स्पष्ट केले आहे की, त्यासाठी पोर्टल तयार केलेले आहे. यावर्शी 25 मेगावॅट क्षमतेपर्यंत केंद्र सरकार द्वारा अनुदान मंजूर आहे.
या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅटपर्यंत जोडभार असल्यास 40 टक्के अनूदान दिले जाईल. घरगुती ग्राहकांचा जोडभार 10 किलोवॅट जोडभारापर्यंत असल्यास पहिल्या तीन किलोवॅटला 40 टक्के तसेच त्यापेक्षा जास्त किलोवॅटला 20 टक्के अनूदान दिले जाईल. तर, 10 किलोवॅटपेक्षा अधिक जोडभार असलेल्या घरगुती ग्राहकांना सोलर रुफ टाॅपवर पहिल्या तीन किलोवॅटवर 40 टक्के तसेच त्यानंतर 7 किलोवॅटवर 20 टक्के अनूदान देण्यात येणार आहे. 10 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेवर कोणतीही सबसिडी या येाजने अंतर्गत नसेल.
त्यासाठी ग्रीड इंटरॅक्टिव रूफटाॅप रिनिवेबल एनर्जी जनरेटींग सिस्टीम अंतर्गत नेट मिटरींगचे निर्देषानुसार व्यवस्था करावी लागणार आहे. महावितरण या कामी लावण्यात येणाऱ्या संचाचे निरिक्षण करून ते व्यवस्थित असल्याचे प्रमाणित करणार आहे.
निवड झालेल्या एजंसीला सोलर रूफ टाॅप लावणाऱ्यांना उच्चमत सेवा देण्याचे बंधन या येाजने अंतर्गत आहे. एजेंसीला आवश्यक संचाचे सर्व सुटया भागांचा साठा करून ठेवावा लागणार आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थिती मध्ये या संचांचे दुरूस्ती काम करण्यासाठी सेवाकेंद्र उभारून त्यात प्रषिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. ही सेवाकेंद्रे आठवडयातून सुटीचे दिवस वगळता सहा दिवस 8 तास सेवा देणार आहे.
महत्वाचे म्हणजे या संचाचे परफार्मन्स रेशियो म्हणजे कामगिरी प्रमाण 75 टक्क्यांचे वर असावे लागणार असून एजंसीद्वारे ते प्रमाण 5 वर्षाच्या कालावधीत राखल्या न गेल्यास एजंसीला दंड आकारण्याचे प्रयोजन या योजनेत आहे. सब्सिडीसाठी कंपनीच्या पोर्टलवर अर्ज करुन अधिकृत वेंडरकडूनच सोलर रुफटाॅप इच्छुक ग्राहकांना लावता येईल. या योजने अंतर्गत नागपूर परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या अकोला,अमरावती,गोंदिया, चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत 4271 सोलर सोलर रूफ टाॅप संच उपलब्ध होणार आहेत.www.mahadiscom/consumerportal/quickaccess/rooftopREapplications या लिंकवर जावून अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.