वादळामुळे खंडित विजपुरवठा बहालीसाठी महावितरण अभियंता व लाईनमन पावसात रात्रीच मैदानात

चंद्रपूर: मध्य रात्रीच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसामुळे गुलाब चक्रीवादळाबाबत जरी रेड अलर्ट असला तरी जोर ओसरल्याने वादळाने फार नुकसान केले नसले तरी महावितरणच्या अभियंता व तांत्रिक कर्मचारी यांची परिक्षा नक्कीच पाहिली.चंद्रपूर परिमंडळातील गडचिरोली मंडलातील आलापल्ली, सिरोंचा, चामोर्शी, कोरची भागात जंगली तसेच गावालागातच्या भागात वीजवाहिण्यावर झाडे , झाडांच्या फांदया तुटून पडल्यामुळे, पीन व डिस्क्ा इंसुलेटर फुटल्यामुळे, जंपर तुटल्यामुळे तसेच तत्सम कारणामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. (११–किव्हो नाचनबटटी,येडणार,अहेरी ग्रामिण, अर्दा, पाथ्री, सोनापूर, वडडम , करासपल्ली, पाटागुडउम,कढोली, ३३–किव्हो अंकीसा, असरअल्ली, पाथ्री, भामरागड,येणापूर, आरमोरी) अशा १७ वाहिण्यांचा तर चंद्रपूर मंडलातील (११–किव्हो कोठारी, बामणी, सास्ती,दरूर, आर्वी, कोरपणा, वनसडी, बेंबाळ, कुडेसावली,लाठी,कवठाळा, घाटकुल,वरवट, ताडाली, MIDC 3,वाघनख, भटाळा, चारगाव, वडगाव, जनाळा, NTPC2, सोनेगाव, म्हाडा,सातगाव, जुनसुर्ला, सुबई, घुटकाळा, विकासनगर, पांढरकवडा व ३३–किव्हो गोंडपिपरी, व्यहाड,चपल्ली, वरोरा MIDC, पार्डी, ताडाली, नागरी ) अशा ३९ वाहिण्यावर वीजवाहिण्यावर झाड, झाडांच्या फांदया तुटून पडल्यामुळे, पीन व डिस्क्ा इंसुलेटर फुटल्यामुळे, जंपर तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. वीजपुरवठा खंडीत होण्याची वेळ रात्रीची असली तरी महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचारी रात्रीच कामाला लागले. परंतु आडवडणाच्या ठिकाणी पोहोचून वीजपुरवठा दुरूस्त करतांना त्यांची चांगलीच दमछाक झाली. अंधारात टॉर्च च्या उजेडात, पहाटे तसेच सकाळी सकाळी हे बिघाड शोधून त्यांनी दुरुस्त केले.
सरासरी ४ ते ५ तासात हे बिघाड शेधून दुरूस्त करण्यात त्यांना यश आले तर काही वाहिण्यांवर वीजपुरवठा दुरूस्तीच्या कामात वेळ लागला.
वीजपुरवठा खंडीत झाला की, वीजकर्मचारी वीजदुरूस्तीच्या कामात लागतात. तर वीज केव्हा येणार, घरचे पंखे, लाईट केव्हा सुरू होणार, लहान थोरांना गार हवा केव्हा मिळणार? असा प्रश्न ग्राहकांना पडतो. उन वारा पावसात काम करणारे महावितरणचे कर्मचारी कधी कधी अतिशय कठीण परिस्थितीतही खंडीत वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी सरसावतात. कधी उन्हाळयात तर कधी पावसाळयात, पुराच्या पाण्यात, कधी दुर्गम जंगलात जंगली श्वापदांच्या भितीत त्यांचे काम अविरत सुरू असते. परंतु काही वेळा अशाही असतात जेव्हा एखादया भागाचा वीजपुरवठा ख्ंडीत होतो परंतु महावितरणद्वरा बॅकफिडींगसारखी सोय उपलब्ध असल्याने त्या भागातील तांत्रिक दोष दुर होत पर्यंत, तात्पुरता वीजपुरवठा हा दुसरीकडून घेवून वीजपुरवठा ख्ंडीत झालेल्या भागास त्याची झळ पोहोचत नाही.परंतु दुरुस्ती करणे आलेच. बिघाड झालेली यंत्रणा दुरुस्त करून पुन्हा विजपुरवठा प्राथमिक सोर्स वर टाकला जातो.
या सर्व ब्रेक डाउन च्या घटना महावितरणचे, कार्यकारी, उपकार्यकारी, शाखा अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, विजतारमार्ग कर्मचारी व सर्व वं संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्त्यव्य बजावत विजपुरवठा पूर्ववत केला व दिवसभर विजपुरवठा खंडित झाल्याच्या शेकडो वैयक्तिक तक्रारी सोडवल्या.
उपकार्यकारी अधिकारी सी. यु. सडमेक, सचिन काळे, एम. मेश्राम, वसंत हेडाऊ, फिरोज कनोजे, श्री. मानकर, सहा. अभि. देशपांडे, विचूलकर, मिथुन मेश्राम, प्रतीक कुहीटे, व कर्मचारी गेडाम, वैद्य, सिंग, गायकवाड, वाघमारे, चिवंडे, जिवतोडे, लोणारे, शिंदे, रायपूरे,कामतवार, दहागांवकर, शेंडे, येनपल्लीवर, सोनटक्के, मडावी, जाडे, डोले, जुनघरे खाडिलकर यांनी दुरुस्ती काम करून विजपुरवठा बहाल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here