पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस;मदत व बचावकार्य सुरु

यवतमाळ:विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली.
उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे बस कळंडली आणि नाल्यात वाहून गेली. उमरखेड वरून पुसदकडे ही बस जात होती, या बसमधून चालक आणि वाहकासह एकूण 5 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आज मंगळवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली ही बस नागपुर आगाराची असून त्याचा बस क्र. ५०१८ आहे. सध्या, स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here