चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक:अध्यक्षपदी ॲड.अभय पाचपोर , उपाध्यक्षपदी ॲड.राजेश ठाकुर तर सचिव पदी आशीष धर्मपुरीवार यांची निवड

चंद्रपूर : चंद्रपूर  जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची द्विवार्षिक निवडणूक आज झाली असून या निवडणुकीत ज्येष्ठ वकील भागवत, खजांची, टंडन, मोगरे, सपाटे, कल्लूरवार, लोहे, दिवसे, वासेकर यांच्या संयुक्त पॅनेलने विजय संपादन केला आहे.
जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक जिल्हा न्यायालयाच्या वकील चेंबरमध्ये पार पडली.  निवडणुकीसाठी दोन पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र या दोन पॅनेलपैकी ज्येष्ठ वकील रविंद्र भागवत, प्रशांत खजांची, मुकुंद टंडन, विजय मोगरे, प्रकाश सपाटे, अभय कल्लूरवार,वामनराव लोहे, भास्कर दिवसे, वासेकर यांच्या पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली आहे.
या पॅनेलचे अठरापैकी अठरा उमेदवार विजयी झाले आहेत.
या बार असोसिएशन निवडणुकीत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अभय पाचपोर , उपाध्यक्षपदी वकील राजेश ठाकुर तर सचिवपदाच्या निवडणुकीत वकील आशीष धर्मपुरीवार हे विजयी झाले आहेत.चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारातील वकील चेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत 618 वकिलांपैकी 563 वकिलांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बलवंतराव टिकले यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here