नागरिकांनी सरकारी नोकरीच्या फसव्या आमिषाला बळी पडू नये

चंद्रपूर दि. 16 सप्टेंबर : नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव व बनावट स्वाक्षरी वापरल्याचा प्रकार जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने उपरोक्त अधिका-यांच्या नावाचा व स्वाक्षरीचा गैरवापर करून आणि परस्पर नोकरीचे बनावट आदेश देऊन शासनाची व तक्रारदाराची फसवणूक केल्याबाबतच्या 2 तक्रारी जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील कार्यालयात दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी प्राप्त झाल्या.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने कथित फसवणूकदार बल्लारपूर तालुक्यातील सरदार पटेल वार्ड येथील रहिवासी ब्रिजेशकुमार बैद्यनाथ याच्याविरुद्ध 15 सप्टेंबर 2021 रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी ,नागरिकांनी सरकारी नोकरी लावून देतो, अशा स्वरुपाच्या कोणत्याही फसव्या अमिषाला बळी पडू नये. तसेच असे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here