ऑनलाइन घरगुती गणेश उत्सव स्पर्धा:चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन 

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाइन घरगुती गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे.

ही स्पर्धा निःशुल्क असून, प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये, द्वितीय बक्षीस ७ हजार ७७७ रुपये, तृतीय बक्षीस ५ हजार ५५५ रुपये, चतुर्थ बक्षीस ३ हजार ३३३ रुपये, पाचवे बक्षीस २ हजार २२२ रुपये यासह प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येणार आहेत.

चंद्रपूर महानारातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर आधारित देखावे तसेच पर्यावरणपूरक, कोरोना जनजागृती बाबतचे देखावे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरिसची नसावी, स्पर्धक हा चंद्रपूर महानगर क्षेत्रातील असावा, अंतिम १५ स्पर्धकांच्या घरी परीक्षण समिती प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सजावटीचे छायाचित्र व स्पर्धकाची माहिती ९९७०७९००३७, ९८६००६५१११, ९६८९९९९९७३, ९०२१२३१६६१ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here