चंद्रपूर शहर कांग्रेस ने केला आमदार गोपीचंद पडळकरांचा निषेध

तोंडाला फासले काळे;प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार

चंद्रपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करणा-या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जुते, चपलांनी चोप देण्यात आला. तसेच तोंडाला काळे फासून निषेध नोंदविण्यात आला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शहरातील कस्तुरबा चौकात मंगळवारी (ता.७) दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून राज्यात उल्लेखनीय काम केले आहे. मात्र, मंत्री विजय वडेट्टीवार यांचे काम विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणतेही पुरावे न देता खोटे आरोप करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर खोटे आरोप करणा-या आमदार पडळकर यांच्याविरोधात राज्यातील बहुजन समाज आणि काँग्रेस प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रितेश तिवारी यांनी यावेळी केली. यावेळी आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जुते, चपलांनी चोपण्यात आले. तसेच तोंडाला काळे फासून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्याकडे आमदार पडळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्ष अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, माजी नगरसेवक दुर्गेश कोड़ाम, उमाकांत धांडे, नरेंद्र बोबडे, सचिन कत्याल, राजेश अडडूर, कुणाल चहारे, मोहन डोंगरे पाटील, माजी नगरसेविका वंदना भागवत, राजू वासेकर, पप्पू सिद्दीकी, इरफान शेख, युसूफ भाई, गौस खान, केशव रामटेके, कादर शेख, विजय धोबे, सुनील पाटील, केतन दुर्सलवार, काशिफ अली, नौशाद शेख, मोनू रामटेके, संजय गंपावार, यश दत्तात्रेय, रमीज शेख, मनोज खांडेकर, राजेश वर्मा, तवांगर गुलजार, केशव रामटेके, शुभम कोराम, वैशाली भगत, स्वाती त्रिवेदी, शीतल काटकर, लता बारापात्रे, वाणी डारला, वंदना वानखेडे, प्रिया चंदेल, मेहक सय्यद, मुस्तफा शेख, सुरेश गोलेवार, अंकुर तिवारी, पोचन्ना बोरम, नागेश बंडेवार, अक्षय दाखरे, यश तिवारी, प्रकाश देशभ्रतार, यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here