
चंद्रपूर: विदर्भात सर्वाधिक पसंतीच्या ‘लेदर बॉल टी-20 सीपीएल’ क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे 12 सप्टेंबर रोजी सायक्लोथॉन, वॉकॅथॉन- मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोरोना काळामुळे होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोरोना काळातील कोविड योद्ध्यांना सलाम करण्यासाठी संस्थेच्या वतीने हे आयोजन होत आहे. फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत मोबाईलवर ॲप आधारित ही सायक्लोथॉन मॅरेथॉन 12 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चौक येथून प्रारंभ होत आहे. कोरोना काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सायकलिंग व दौड महत्वाचे ठरले आहे. यावर भर देण्यासाठी आयोजित या उपक्रमात चंद्रपूरकर इच्छुकांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन लाईफ फाउंडेशनच्या वतीने प्रकल्प संयोजक रईस काजी यांनी केले आहे. सायक्लोथॉन व मॅरेथॉनला विविध गटात विभागण्यात आले असून यासाठी आपल्या मोबाईल वरील ॲप द्वारे उपक्रम पूर्ण करता येणार आहे. सायक्लोथॉन- मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना मेडल- सर्टिफिकेट व टी-शर्ट दिले जाणार असून या अनोख्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी लाईफ फाउंडेशनचे सदस्य कार्यरत आहेत. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्री कमल जोरा, जोरा ज्वेलर्स, सराफा लाईन, चंद्रपूर व श्री बॉबी दीक्षित, रामायण ट्रॅव्हल्स, सपना टॉकीज चौक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.