
चंद्रपूर : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे वडील अनिल बाबुराव गिऱ्हे यांचे आज शुक्रवारी दीर्घ आजाराने नागपूर येथील एका खासगी रूग्णालायत निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील शांतीधाम येथे सायंकाळी पाच वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.