
माजी महापौर अंजली घोटेकर यांचा इशारा
चंद्रपूर: आज दिनांक ३.९.२०२१ ला आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहीते यांना शहरात वाढत चाललेल्या डेंग्यु व मलेरिया या रोगाचे थैमान व त्यावर योग्य उपाययोजना करण्याकरीता भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. अंजली घोटेकार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
कारोनामुळे आधीच शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे त्यातच आता डेंग्यु व मलेरियाने शहरात थैमान घातले आहे. डेंग्युमुळे नागरिकांचा मृत्यु देखील होत आहे.
मनपाद्वारे काही प्रभागात नगरसेवकांच्या सक्रीयतेने फॉगींग फवारणी होत आहे. अजुनही बरेचशे प्रभागात फॉगींग फवारणी झालेली नाही, ती करणे अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही प्रभागात भेदभाव न करता सर्व प्रभागात फवारणी व फॉगींगची मोहीम राबविली गेली पाहीजे. मनपामध्ये मोठे फॉगींगचे वाहन एकच आहे. तरी प्रत्येक झोन वाईज एक-एक फॉगींग मशीन अशा तीन फॉगींग वाहन मशीन आणि स्प्रे पंप फवारणीसाठी ५० स्प्रे पंप त्वरीत घ्यावे व चांगल्या दर्जाचे औषध वापरावे अशी सुचना यावेळी महिला मोर्चासाठी करण्यात आली. येत्या ८ दिवसात जर या उपाययोजना केल्या नाहीत तर आयुक्त यांच्या दालनामध्ये बैठा सत्याग्रह करू, थाळीनाद करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. त्वरीत युध्द पातळीवर प्रत्येक प्रभागाचे नियोजन करून तसा चार्ट बनवून प्रत्येक प्रभागात होर्डींग्ज लावावे व एक खास अधिकारी यासाठी नेमून द्यावा व जनतेला त्याबद्दल माहितीही द्यावी अशी सुचनाही करण्यात आली. यावेळी भाजपा नगरसेविका व महिला मोर्चा महामंत्री सौ. शिला चव्हाण, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. किरण बुटले, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. रेणु घोडेस्वार, सौ. रंजना रमेश जेंगठे, सोनु प्रभाकर डाहूले व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.