

माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवार यांचे महसूलमंत्र्यांना पत्र
चंद्रपूर: चंद्रपुरात अनेक प्लॉटचे अद्याप एन.ए.झालेले नाही.त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ज्या प्लॉट धारकला एन ए ची गरज आहे अश्या प्लॉट धरकांनाच मोजणीची रकम आकारण्यात यावी.अशी मागणी माजी अर्थमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख ज्यांना सद्या एन ए ची गरज नाही अथवा मोजणीची मागणी केली नाही,अश्यानांही वेठीस धरत आहे.त्यामुळे ज्याला गरज आहे,त्यांना याचा नाहक त्रास होत आहे,याकडे भाजपा सहकार मोर्चा जिल्हाध्यक्ष
प्रशांत कोलप्याकवार यांनी निवेदनातून माजी अर्थमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. चंद्रपूर मधील सन 2014 च्या पूर्वी लेआऊट मंजुरी प्रकरणात तात्पुरती मंजुरी नगर रचनाकार विभागाकडुन घेऊन तसेच इतर विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर संबंधित सक्षम अधिकारी एन ए चा आर्डर करत होते. एन ए झाल्यानंतर फेरफार करण्यात येत असुन त्याद्वारे सातबारा देण्यात येत होते. सन 2015 पासुन अंतिम मंजुरी नगर रचनाकार विभागाची घेणे बंधनकारक करण्यात आली. परंतु सन 2014 पूर्वीचे असंख्य एन ए आदेश झालेले लेआऊट मध्ये मागील प्लॉटची मोजणी करावयाची झाल्यास संबंधित उप अधिक्षक, भुमी अभिलेख हे पूर्ण लेआऊटच्या मोजणीचे पैसे भरण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे नाहक मोजणी धारकांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी ज्या मोजणी धारकाचा प्लॉट मोजणी करावयाचा आहे तेवढयाच प्लॉटची मोजणीची रक्कम भरणा करून घेण्या यावी अशी मागणी नागरिकांची असल्याने याबाबत त्वरीत योग्य कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश द्यावेत,अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी महसुलमंत्र्यानां पाठविलेल्या पत्रातून केली आहे.