महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती गुरुवारी जिल्ह्यात

चंद्रपूर दि. 31 ऑगस्ट : महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यात दाखल होणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम 4 सप्टेंबरपर्यंत आहे.
गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी उर्जानगर येथील हिराई विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधींसोबत रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत चर्चा. त्यानंतर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी.
शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी. शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांसोबत बैठक.
महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख म्हणून सडक अर्जुनी (जि. गोंदिया) चे आमदार मनोहर चंद्रिकापूरे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 25 सदस्यांची (विधान परिषद व विधान सभा) चमू जिल्ह्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here