विज कनेक्शन कापण्याची अन्यायकारक मोहीम त्वरीत थांबवा

महावितरणची तानाशाही खपवून घेणार नाही:आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:ग्रामीण भागामध्‍ये ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे विजबिल न भरल्‍यामुळे महावितरणकडून विज कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम चालविण्‍यात आली आहे. ही मोहीम तात्‍काळ थांबवून ग्रामपंचायतीच्‍या सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे कनेक्‍शन पूर्ववत करून अखंडीतपणे विज पुरवठा करावा व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अन्‍यथा या महावितरणच्‍या अन्‍यायाविरोधात रस्‍त्‍यावर उतरून भारतीय जनता पार्टीतर्फे तिव्र आंदोलन उभारण्‍यात येईल, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बेताची नसल्‍यामुळे विजबिल भरण्यास उशीर होत आहे , त्यांनी तशी मुदत देखील मागितली आहे , तरीही महावितरणाद्वारे ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम चालविण्‍यात आली आहे. त्याचा फ़टका नागरिकाना बसत आहे . सध्‍या पावसाचे दिवस सुरू असून साप, विंचु निघत असतात. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी प्रकाशाची व्‍यवस्‍था असली पाहीजे. ग्रामपंचायतीने विजबिल भरण्‍यासाठी काही मुदत मागीतली आहे. त्‍यामुळे त्‍यांना ती मुदत देवून पावसाळा निघुन गेल्‍यानंतर यावरती यथायोग्‍य मार्ग काढून समस्‍या सोडविण्‍यात यावी त्‍याचप्रमाणे सार्वजनिक प्रकाशयोजना कायम ठेवून नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्‍यात येत आहे. नागरिकांवर अन्‍याय करून विज कनेक्‍शन कापल्‍यास भारतीय जनता पार्टी आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर उतरेल असा इशारा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here