

चंद्रपूर: आज सोमवार दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी चंद्रपूर जिल्हा सराफा असोसिएशन व शहर सराफा असोसिएशन तर्फे हालमार्किंग संदर्भातील HUID विरोधात एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. HUID चा विरोध करतांना चंद्रपूर जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोढा व चंद्रपूर शहर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष भारत शिंदे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर सराफा असोसिएशनची कार्यकारणी उपस्थित होती.सुभाष शिंदे, भीवराज सोनी, हिरा सोनी, श्री संजय सराफ, मितेश लोढीया, समीर आकोजवार, मनोज डोमाडे, आशु सागोळे, राकेश ठकरे, ओम वर्मा, प्रशांत कंदीकुरवार, बुधमल सोनी, जितेंद्र द्विवेदी, किशोर जाधव, विजय कासरलेवार, राजेन्द्र कोठारी, कमल नादा प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यकारणी मधील सर्व सदस्यांनी मिळून चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना HUID विरोधात निवेदन देण्यात आले.