पालिका निवडणुकांचा वाजणार बिगुल !

राज्य निवडणूक आयोगाने दिले हे निर्देश

मुंबई:डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदा, नगरपंचायती व नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूभ प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.
पालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय सदस्याऐवजी एक सदस्यीय पद्धत असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी यासंदर्भात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवले आहे. त्यात डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील मुदती संपणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले आहे.

काय आहे आदेश

१) महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे.
२)प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना या पत्राद्वारे दिल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, मा. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here