
चंद्रपूर:चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार भवनाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण समारंभ चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष श्री.विनोदसिंह (बबलू) ठाकुर यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
श्री. ठाकुर यांनी कोरोना आजारावर मात करण्यासाठी सैनिटाइजर, मास्क व सुरक्षित अंतर ठेवत नियमाचे पालन करावे अशी सर्व पत्रकारांना विनंती केली तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन संघाचे माजी अध्यक्ष श्री. मुरलीमनोहर व्यास यांनी केले.
याप्रसंगी परिषद प्रतिनिधी बबन बांगडे,माजी अध्यक्ष चंद्रगुप्त रायपुरे, सरचिटणीस सुनिल तिवारी,उपाध्यक्ष वैभव पलिकुंडवार, कोषाध्यक्ष मोरश्वर राखूंडे,नामदेव वासेकर,विजय लडके, रवि नागपुरे, रमेश जयस्वाल,हेमंत रुद्रपवार उपस्थित होते.सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून झेंडावंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.