चंद्रपुरात घरफोडी करुन 76 तोळे सोने व 15 लाख रुपये चोरी करणारे आरोपी अवघ्या 24 तासांत अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची कामगिरी

चंद्रपूर: दिनांक 05/08/2021 ते 06/08/2021 चे रात्रौ. दरम्यान रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील माऊंट कॉन्व्हेंट शाळेजवळील फिर्यादी राजेंद्र रामलाल जयस्वाल, वय 65 वर्षे यांचे राहते घरी कोणीही हजर नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे समोरील दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन बेडरुम मधील 76 तोळे सोने व नगदी 15,00,000/- रुपये चोरुन नेलेबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन रामनगर पोलीस ठाणे अप.क्र. 756/21 कलम 547, 380 भा.दं.वि. अन्वये दिनांक 06/08/2021 रोजी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी गुन्हा उघडकीस आणणेकरीता निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री. शिलवंत नांदेडकर व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, फिर्यादी यांचे गाडीवर चालक म्हणून काम करणारा सादीक रफीक शेख, रा. जलनगर वार्ड, चंद्रपुर हा त्याचे घरुन फरार आहे. तसेच गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, त्याचेसोबत महेश गजानन श्रीरामवार, वय 23 वर्षे, रा. बालाजी वार्ड चंद्रपुर हा सुध्दा फरार आहे. त्यामुळे तपासाला योग्य दिशा व गती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस ठाणेची तपास पथके रवाना झाली.

दिनांक 07/08/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, महेश गजानन श्रीरामवार, वय 23 वर्ष, रा. बालाजी वार्ड हा चंद्रपुर शहर हद्दीतील पठाणपुरा रोड वर फिरत आहे. अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होऊन त्यांनी महेश गजानन श्रीरामवार, वय 23 वर्षे, रा. बालाजी वार्ड यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सादीक रफीक शेख, रा. जलनगर वार्ड, चंद्रपुर व चेतन कालीदास तेलसे, वय 22 वर्षे, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपुर यांनी मिळुन राजेंद्र रामलाल जयस्वाल यांचे घरातील नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिणे चोरी केली असल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेल्या नगदी रक्कमपैकी काही रक्कम ही सादीक चे घुग्घुस येथे राहणारे नातेवाईक शेख नवाझ शेख दादामियाँ, वय 43 वर्ष, रा. वार्ड क्र. 1 नकोडा यांचे घरी ठेवली असल्याचे सांगितले. मिळालेल्या खबरेवरुन नकोडा येथुन शेख नवाझ शेख दादामियाँ यांचे घरातुन गुन्ह्यात चोरीस गेलेली नगदी 14,16,400/- रु. जप्त करण्यात आले आहेत.
गुन्ह्यातील इतर आरोपींचा व चोरीस गेलेल्या उर्वरीत मालाचा शोध घेणेकामी पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पथकाची दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेणेकामी रवाना झाले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी सादीक रफीक शेख, वय 32 वर्षे, रा. जलनगर वार्ड चंद्रपुर यास गडचिरोली येथुन तसेच आरोपी चेतन कालीदास तेलसे, वय 22 वर्षे, रा. दुर्गापुर यास नागपुर येथुन ताब्यात घेऊन दोन्ही आरोपीतांकडुन 1) सोन्याची चैन व लॉकेट 237 ग्रॅम, 2) 9 नग सोन्याच्या अंगठ्या 223 ग्रॅम, 3) सोन्याचा नेकलेस 53.230 ग्रॅम, 4) 5 नग सोन्याचे चैन वजन 87.890 ग्रॅम, 5) 3 नग सोन्याचे मंगळसूत्र 132.270 ग्रॅम असा एकुण 76 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच घरातील चोरीस गेलेल्या मालाव्यतिरीक्त 1) चांदीचा कमरपट्टा 339 ग्रॅम, 2) सोन्याचा लेडीज कडा 51.150 ग्रॅम, 3) 4 जोड चांदीचे चाळ 602 ग्रॅम, 4) चांदीचे ब्रेसलेट 7.230 ग्रॅम, 5) चांदीचा छल्ला 19.720 ग्रॅम, 6) दोन चांदीचे करंडे 45.28 ग्रॅम, 7) एक नग चांदीचा शिक्का 5.23 ग्रॅम असा एकुण 26,20,323/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस ठाणे पथकांनी मिळुन गुन्ह्यात चोरीस गेलेला एकुण 40,36,723/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. बाळासाहेब खाडे, पो.उप.नि. संदीप कापडे, सचिन गदादे, रामनगर पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रदिपकुमार शेवाळे, स.पो.नि. मलिक, एकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश बलकी, नितीन साळवे, मिलींद जांभुळे, सुभाष गोहोकार, धनराज करकाडे, संजय आतकुलवार, अविनाश दशमवार, गजानन नागरे, अमजद खान, प्रशांत नागोसे, रवि धंदरे, अमोल पंधरे, गोपाल आतुकलवार, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी, नितीन रायपुरे, राजेंद्र खनके, गणेश भोयर, विनोद जाधव सायबर सेलचे मुजावर अली, छगन जांभुळे, प्रशांत लारोकार, अमोल सावे रामनगर पोलीस ठाण्याचे रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, विनोद यादव, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, माजीद पठाण, भावना रामटेके यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here